जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे शिवसैनिक आणि आमदार राजेंद्र पाटील यांच्या गटात झटापट !

जयसिंगपूर येथे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले अपक्ष आमदार आणि शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी २७ जून या दिवशी निदर्शने केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात शिवसैनिकांचा मोर्चा !

‘शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है’, यांसह अन्य घोषणा देत शिवसैनिकांनी २४ जून या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात भव्य मोर्चा काढला.

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी ‘पथकर’ नाक्यावर पथकर चालूच रहाणार !

पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी (तालुका हातकणंगले) येथील पथकर नाक्यावरील खासगी आस्थापनाचा पथकर वसुलीचा कालावधी २४ जून या दिवशी संपला. आता हा महामार्ग आणि पथकर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला आहे.

पंचांगातील ‘ महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होतील’, हे भविष्य खरे ठरले !

भारतीय पंचांग हे भविष्याचे अचूक वेध घेणारे शास्त्र आहे. पंचांगामध्ये वर्तवले जाणारे भविष्य हे नेहमीच दिशादर्शक असते. यंदाही जून मासाच्या पंचांगात वर्तवण्यात आलेल्या भविष्यामधील अनेक भाग सत्य होतांना दिसत आहेत.

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

या प्रसंगी श्री. महाडिक यांना सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

‘हलाल जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, ‘थूंक जिहाद’ अशा विविध जिहादच्या माध्यमांतून हिंदूंवर आक्रमण ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

विविध प्रकारच्या जिहादची भयावहता लक्षात घेऊन हिंदूंनी संघटितपणे, तसेच स्वधर्मपालनाद्वारे त्याचा प्रतिकार करणे आवश्यक !

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा !

शिवछत्रपतींचा विशाळगडरूपी असलेला अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहे. गडावर १०० ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत.

श्री महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत ८३ लाख रुपयांचे दान !

श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानपेटीतील दानाची मोजणी करण्यात आली. १४ जून या दिवशी ३६ लाख ३१ सहस्र २०० रुपये, तर १५ जून या दिवशी उर्वरित पेट्यांमधून ४७ लाख ४३ सहस्र ४६४ रुपयांचे दान मिळाले. दोन दिवसांची एकूण रक्कम ८३ लाख ७४ सहस्र ६६४ रुपये झाली.

कु. स्वरूप दिलीप पाटील याला १२ वीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण !

आपल्या यशाविषयी कु. स्वरूप म्हणाला, ‘‘अभ्यास करतांना नियमित खोलीची शद्धी करून प्रार्थना करून अभ्यासास प्रारंभ करत असे.

काही बेशिस्त भाविकांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात टाकल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या !

मंदिराच्या  परिसरात सात्त्विकता टिकवणे हे भाविकांचेही कर्तव्य आहे, हे समजण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यातून अधोरेखित
होते ! मंडपाच्या छतावर बाटल्या नेऊन कुणी टाकल्या याचा शोध घेऊन त्यांना शासन करायला हवे !