कोल्हापूर जिल्ह्यात २ दिवसांपासून संततधार पावसाने पंचगंगा ३२ फुटांवर !
गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीची पातळी ३२ फूट ७ इंच इतकी झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरण ५७.६७ टक्के भरले आहे.
गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीची पातळी ३२ फूट ७ इंच इतकी झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरण ५७.६७ टक्के भरले आहे.
जिल्ह्यासह मराठवाड्यात ८ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे, तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. पावसामुळे सहस्रो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा अल्प झाल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीची वाढ अल्प गतीने होत आहे. ७ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ४ इंच इतकी नोंदवली गेली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथून पंढरपूर येथे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत मिरजजवळ बोलेरो गाडी घुसल्यामुळे १७ वारकरी घायाळ झाले आहेत. या घायाळ वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे.
हवामान विभागाने पुढील ३ दिवस सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. त्यासाठी या चारही जिल्ह्यांत एन्.डी.आर्.एफ्.’ची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) पथके दाखल झाली आहेत.
राजस्थानमधील कन्हैयालाल, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.
६ ते १४ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रा होत असून १० जुलै हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावांतील भाविक पंढरपूर येथे प्रवास करतात.
राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांची आतंकवाद्यांनी दुकानात घुसून निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर इस्लामिक जिहादी आतंकवाद्यांनी धमकीचा ‘व्हिडिओ’ सर्वत्र पसरवून भारताच्या एकात्मतेला आव्हानच दिले.
महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांच्या जलसंपदा, जलसंधारण विभागाचे सचिव, संबंधित राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आदींसह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यंदा १०४ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता, त्यामुळे शेतकर्यांनी खरिपासाठी जोरदार सिद्धता केली होती.