शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात शिवसैनिकांचा मोर्चा !

शिवसैनिकांचा मोर्चा

कोल्हापूर, २५ जून (वार्ता.) – ‘शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है’, यांसह अन्य घोषणा देत शिवसैनिकांनी २४ जून या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात भव्य मोर्चा काढला. दुपारी १२ वाजता दसरा चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्च्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

या प्रसंगी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांसह अन्य उपस्थित होते.