‘महेश क्लब ऑफ इचलकरंजी’ यांच्या वतीने ‘जिहाद’वर व्याख्यान !
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – ‘हलाल जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, ‘थूंक जिहाद’, ‘बॉलीवूड जिहाद’, ‘चित्रपट जिहाद’, ‘गड जिहाद’ यांसह विविध प्रकारच्या जिहादच्या माध्यमांतून हिंदूंची अर्थव्यस्था, कुटुंबव्यवस्था, सामाजिक व्यवस्था अशांवर आक्रमण होत आहे. याची भयावहता लक्षात घेऊन हिंदूंनी संघटितपणे, तसेच स्वधर्मपालनाद्वारे त्याचा प्रतिकार करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. ‘महेश क्लब ऑफ इचलकरंजी’ यांच्या वतीने ‘जिहादच्या माध्यमातून होणारे आक्रमण’ याविषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. ‘महेश क्लब ऑफ इचलकरंजी’चे श्री. बद्रीनारायण भुतडा यांचा व्याख्यानाचे आयोजन करण्यात पुढाकार होता.
सनातन संस्थेचे त्वचारोगतज्ञ आधुनिक वैद्य (डॉ.) मानसिंग शिंदे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी ‘धर्मपालनाचे महत्त्व’ यावर उपस्थितांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. रामदेवजी मंत्री यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन श्री. प्रेमजी मंत्री यांनी केले. श्री. राधेशामजी भुतडा यांनी आभार व्यक्त केले.
विशेष
१. ‘महेश क्लब ऑफ इचलकरंजी’ने हिंदु जनजागृती समितीच्या ‘हलाल जिहाद’च्या ग्रंथांची मागणी केली.
२. या वेळी उपस्थितांनी ‘या विषयामुळे जिहादविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ही माहिती आजपर्यंत आमच्यापर्यंत पोचली नव्हती’, असे सांगितले.
श्री. राधेशामजी भुतडा यांनी ‘समितीचे कार्यकर्ते वेळात वेळ काढून राष्ट्र-धर्मासाठी झटत आहेत’, असे गौरवोद्गार काढले.