
कोल्हापूर, २५ जून (वार्ता.) – पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी (तालुका हातकणंगले) येथील पथकर नाक्यावरील खासगी आस्थापनाचा पथकर वसुलीचा कालावधी २४ जून या दिवशी संपला. आता हा महामार्ग आणि पथकर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला आहे. हस्तांतरित झाल्यानंतरही पथकर चालूच रहाणार असून प्रवाशांना दिलासा देण्याऐवजी चारचाकीसाठी १० रुपये, तर अवजड वाहनांसाठी १५ रुपये दरवाढ लादण्यात आली आहे.
‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’, या तत्त्वावर राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गाचे चौपदरीकरण करून वर्ष २००५ मध्ये किणी (कोल्हापूर) आणि तासवडे (सातारा) येथे पथकर नाके उभे करून पथकर घेण्यास अनुमती दिली होती. याचा कालावधी मे २०२२ मध्ये संपल्यानंतर कोरोना आणि महापूर यांमुळे खासगी आस्थापनास याचा कालावधी ५३ दिवसांनी वाढवून देण्यात आला होता. आता यापुढील काळात २४ घंट्यांत परतीच्या प्रवासासाठी दुपटीऐवजी दीडपट पथकर द्यावा लागणार आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !