जहाल नक्षलवादी नर्मदा हिचा कर्करोगामुळे भायखळा कारागृहात मृत्यू !

नर्मदा हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथील ‘दंडकारण्य बंद’ची घोषणा केली आहे. ‘उत्पीडित जनता की प्यारी नेत्री कॉमरेड नर्मदा दी अमर रहे ।’ अशी भित्तीपत्रके गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात लावण्यात आली आहेत.

अधिवक्ता सदावर्ते पुन्हा आर्थर रोड कारागृहात जाणार !

अधिवक्ता सदावर्ते यांची सातारा येथील पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना सातारा जिल्हा न्यायालयात उपस्थित करण्यात आले. दोन्ही पक्षाने न्यायालयासमोर युक्तिवाद केला.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून अफूची शेती करण्यावर बंदी !

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारकडून अफूच्या शेतीवर बंदी घालण्यात आली आहे. येथील अफूचा जगभरात पुरवठा होतो. या दिवसांत संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये अफूची शेती करण्यास आरंभ होतो. त्या पार्श्‍वभूमीवर तालिबानने वरील चेतावणी दिली आहे.

कारागृहातील बंदीवानांना ५० सहस्रांपर्यंत कर्ज मिळणार !

कारागृहातील कामांसाठी मिळणाऱ्या बंदीवेतनाच्या आधारावर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक बंदीवानांना कर्जपुरवठा करणार आहे. त्यानुसार बंदीवानांना ७ टक्के इतक्या माफक दराने कर्ज दिले जाईल.

गेल्या २५ वर्षांपासून पाकच्या कारागृहात अटकेत असणार्‍या सैन्याधिकारी मुलाच्या सुटकेसाठी वृद्ध मातेची सर्वोच्च न्यायालयात याचिका !

गेल्या २५ वर्षांपासून भारतीय सैन्याधिकारी पाकच्या कारागृहात अटकेत असूनही इतकी वर्षे त्याच्या सुटकेसाठी भारत सरकारने काहीच प्रयत्न केले नसतील, तर ही अक्षम्य चूक आहे. याला तेव्हापासून आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत.

येरवडा (पुणे) मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना मिळणार पंचगव्य उत्पादने आणि गोआधारित शेतीचे धडे !

कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर प्रत्येक कैद्यास स्वावलंबी आणि सन्मानाने जीवन जगता यावे यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘नंदनवन’ हा प्रकल्प राबवण्यात येतो. या प्रकल्पात आता देशी गोवंशापासून विषमुक्त सेंद्रिय शेती आणि पंचगव्य उत्पादने यांचाही समावेश !

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने दिले आहेत.

हिंडलगा (बेळगाव) कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवल्याने संताप : हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाब विचारून पुन्हा नवी प्रतिमा लावली !

स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असल्यानेच हिंदुद्वेषापोटी कारागृह प्रशासन त्यांची प्रतिमा हटवण्याची कृती करते !

हर्सूल (संभाजीनगर) येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांसाठी पहिले रेडिओ केंद्र चालू होणार !

रेडिओवरील कार्यक्रमांसमवेत बंदीवानांना योग आणि धर्मशिक्षण देणेही आवश्यक आहे. धर्मशिक्षणामुळे त्याप्रमाणे आचरण करून स्वतःमध्ये ते पालट करू शकतील.

ब्रिटनचे राजकुमार कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी बलात्कारित महिलेला ९१४ कोटी रुपये देणार !

ब्रिटनच्या राजघराण्यातील मंडळी ही चारित्र्यहीन आणि व्यभिचारी कृत्यांसाठीच कुप्रसिद्ध आहेत. प्रिन्स अँड्र्यू यांच्या या कृतीतून राजघराण्यावर आणखी एक कलंक लागला. अशा राजघराण्याचा भारतियांनी उदोउदो करू नये, एवढेच !