थायलंडमध्ये बौद्ध भिक्षूने स्वतःचे शिर कापून भगवान बुद्धाला केले अर्पण !

बौद्ध भिक्षू

बॅकाँक (थायलंड) – एका ६८ वर्षीय बौद्ध भिक्षूने येथील बौद्ध मंदिरात भगवान बुद्धाच्या मूर्तीसमोर स्वतःचे शिर कापून अर्पण केले. मोठे संत बनण्यासाठी या भिक्षूने असे केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ११ वर्षांपासून हे भिक्षू याच मंदिरात रहात होते. गेल्या ५ वर्षांपासून हे भिक्षू स्वतःचे प्राण अर्पण करण्याचे नियोजन करत होते. त्यांचे असे म्हणणे होते की, जर त्यांनी भगवान बुद्धाला शिर कापून अर्पण केले, तर त्याचे फळ त्यांना पुढील जन्मात मिळेल. मूर्तीसमोर शिर कापल्यावर स्वतः भगवान बुद्ध तेथे येतील आणि ते दोन्ही हातांनी त्यांचे शिर पकडतील, असे या भिक्षूचे म्हणणे होते.