८१ टक्के लसीकरण आणि संसर्ग न्यून झाल्याने इस्रायलमध्ये मास्कला सुट्टी !

नवी देहली – इस्रायलमध्ये आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालण्याची आवश्यकता नाही, असा आदेशच प्रशासनाने तेथील नागरिकांना दिला आहे. प्रशासनाच्या आदेशामुळे लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. इस्रायलची लोकसंख्या ९३ लाख असून यांतील ८१ टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. इस्रायलमध्ये ८ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती, तर ६ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आता तेथे कोरोनाबाधितांची संख्या न्यून झाली आहे. इस्रायलमध्ये येणार्‍या विदेशींना लस घेतल्याविना येण्यास अनुमती नाही.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, कोरोना विषाणूवर विजय मिळवण्यात आम्ही जगाचे नेतृत्व करत आहोत; मात्र अद्याप पूर्ण युद्ध संपलेले नाही. कोरोना पुन्हा येऊ शकतो.