चीनच्या तैवानवर आक्रमण करण्याच्या शक्यतेमुळे ऑस्ट्रेलिया करत आहे युद्धसज्जता !

बीजिंग (चीन) – येत्या ५ वर्षांत चीनकडून तैवानवर आक्रमण करण्याच्या शक्यतेमुळे ऑस्ट्रेलियाने चीनशी युद्ध करण्याची सिद्धता चालू केली आहे. यासाठी रणनीती आखण्यात येत आहे.

याच आठवड्यात चीनने त्याच्या २५ लढाऊ विमानांची एक तुकडी तैवानच्या आकाश क्षेत्रात पाठवली होती. चीनची लढाऊ विमाने सातत्याने अशा कुरापती काढत आहे. यामुळेच ऑस्ट्रेलियाने युद्धाची सिद्धता चालू केली आहे. चीन गेल्या अनेक वर्षांपासून तैवान त्याचा भाग असल्याचा दावा करत आहे.