चिनी सैन्याचा हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा आणि देप्सांग येथून माघार घेण्यास नकार

मागील सैन्य स्तरावरील बैठकीत माघार घेण्याची सहमती दर्शवली होती !

चीन विश्वासघातकी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चिनी सैन्याने जरी माघार घेतली असती, तरी त्याने परत अधिक गतीने भारतात घुसखोरी केली असती ! यामुळेच चीनपासून भारताने सतर्क रहाणेच आवश्यक !

नवी देहली – चीनने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा आणि देप्सांग येथील सीमेवरून सैन्याला मागे हटवण्यास नकार दिला असल्याचे समजते. भारत आणि चीन यांच्यामध्ये गेल्या आठवड्यात सैनिकी स्तरावर झालेल्या ११व्या फेरीत १३ घंटे चर्चा झाली होती. या चर्चेत चीनने गोग्रा, हॉट स्प्रिंग्स आणि देप्सांग पेट्रोलिंग पॉईंट १५ आणि पेट्रोलिंग पॉईंट १७ ए या भागांतून सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शवली होती; मात्र आता चीनने त्याचेे सैन्य मागे घेण्यास नकार दिल्याचे समजते. भारतीय सैन्याने पेट्रोलिंग पॉइंट १५ आणि पेट्रोलिंग पॉइंट-१७ ए पर्यंत असलेली चिनी सैन्याची गस्त मान्य करावी अशीच चीनची इच्छा असल्याचे स्पष्ट होते आहे. ‘भारताला जेवढे मिळाले आहे, त्यात त्याने समाधानी असले पाहिजे’, असे चीनने म्हटले आहे.