|
हेलसिंकी – (स्विडन) – युरोपमधील अनेक देशांमध्ये मध्य-पूर्व देशांतील यादवीमुळे लाखोंच्या संख्येने मुसलमान शरणार्थी पोचले आहेत. त्यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून युरोपीय देशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे. यातच स्विडनमध्ये पुढील ४५ वर्षांत मूलनिवासी लोक अल्पसंख्य होऊन मुसलमान शरणार्थी बहुसंख्य होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या स्विडनमध्ये एक तृतीयांश नागरिक अन्य देशांतील आहेत. त्यांचा प्रजनन दर मूलनिवासी यांच्यापेक्षा अधिक आहे. यामुळे स्विडन एक मुसलमानबहुल देश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फिनलँड येथील संशोधक क्योस्ति तरवीनैन यांनी त्यांच्या संशोधनातून हे सूत्र मांडले आहे.
संशोधक क्योस्ति तरवीनैन यांनी मांडलेली सूत्रे
१. स्विडनमध्ये विदेशील लोकांची नागरिकता सध्याच्या दराने वाढली, तर पुढील ४५ वर्षांत मूलनिवासी अल्पसंख्य होतील. वर्ष २१०० पर्यंत स्विडनमधील लोकसंख्येमध्ये मुसलमान बहुसंख्य असतील.
२. विदेशींच्या वाढत्या लोकसंख्येमुळे स्विडनमध्ये मोठ्या स्तरावर सांस्कृतिक पालट झाला आहे. पूर्वी स्विडनमध्ये फिनलँड येथील नागरिकांची संख्या अधिक होती. आता त्याची जागा मुसलमानांनी घेतली आहे. पूर्वी फिनलँडचे लोक येथील नागरिकांमध्ये मिसळत होते; मात्र मुसलमान स्विडिश नागरिकांशी सहज मिसळत नाहीत. ते स्वतःचा क्षेत्र निर्माण करत आहेत आणि त्यात अन्य कुणी येऊ शकणार नाही, अशी स्थिती निर्माण करत आहेत.