Indian Navy Chief : व्हाइस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी भारतीय नौदलाचे नवे प्रमुख होणार

नौदलाचे नवे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी

नवी देहली – व्हाइस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांची भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर्. हरि कुमार ३० एप्रिलला निवृत्त होत आहेत. त्याच दिवशी व्हाइस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी पदभार स्वीकारतील.

व्हाइस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यापूर्वी वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ राहिले आहेत. व्हाइस अ‍ॅडमिरल त्रिपाठी यांनी त्यांच्या ३९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत भारतीय नौदलातील अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. ते एक संप्रेषण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध विशेषज्ञ आहेत. व्हाइस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आय.एन्.एस्. किर्च, त्रिशूल आणि विनाश या नौदलाच्या युद्धनौकांचे नेतृत्व केले आहे.