जयपूर विकास प्राधिकरणाच्या उपायुक्त ममता यादव यांना लाच घेतांना अटक

अशा निर्लज्ज लाचखोरांना फाशीची शिक्षा झाली, तरच देशातील भ्रष्टाचार न्यून होईल !

मध्यप्रदेशातील होशंगाबादचे नामकरण आता नर्मदापूरम्  

राज्यातील होशंगाबादचे नाव नर्मदापूरम्, शिवपुरीचे नाव कुंडेश्‍वर धाम आणि कवी माखनलाल चतुर्वेद यांचे जन्मस्थळ बाबईचे नाव माखन नगरी असणार आहे.

वाहनतळासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिलेच शहर ! – महापालिका आयुक्त

मुंबईतील वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ‘मुंबई पार्किंग अथॉरिटी’ नेमण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा दिवाळखोरीतला अर्थसंकल्प ! – प्रभाकर शिंदे, भाजप

‘आयुक्त’ विविध प्रकल्प मुंबईत आणू, असे सांगतात; मात्र यासाठी उत्पन्न कुठून येणार ? ‘याचे नियोजन अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही’, – भाजप नेते प्रभाकर शिंदे

सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून अंत्यसंस्कारांना उपस्थित रहाणार्‍या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल, तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी रहित केली आहे

भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी

भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नाेंद

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३०१ उमेदवार रिंगणात

मतदान १४ फेब्रुवारी या दिवशी होणार असून १० मार्च या दिवशी मतमोजणी होणार आहे.

सांगली जिल्ह्यातील १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा १ फेब्रुवारीपासून चालू होणार ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

काही दिवसांपासून कोरोना पडताळणीचा ‘पॉझिटिव्हिटी’ दर स्थिर असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या अल्प होतांना दिसत आहे.

भारतातील बांगलादेशाच्या राजनैतिक अधिकार्‍याला बांगलादेशाने माघारी बोलावले !

बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयातील अधिकारी महंमद सानियुल कादर याला महिलांना अश्‍लील संदेश आणि व्हिडिओ पाठवल्याच्या प्रकरणी बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशमध्ये बोलावून घेतले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने १० रुपयांच्या नाण्याच्या वैधतेविषयी स्पष्ट करावे !

अशी मागणी का करावी लागते ? रिझर्व्ह बँकेच्या हे लक्षात येत नाही का ?