मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा दिवाळखोरीतला अर्थसंकल्प ! – प्रभाकर शिंदे, भाजप

प्रभाकर शिंदे,

मुंबई – महानगरपालिकेच्या आयुक्तांनी हा दिवाळखोरीतला अर्थसंकल्प सादर केला आहे. ‘आयुक्त’ विविध प्रकल्प मुंबईत आणू, असे सांगतात; मात्र यासाठी उत्पन्न कुठून येणार ? ‘याचे नियोजन अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही’, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.

चांगल्या गोष्टी अर्थसंकल्पातून दिसत आहेत ! – आदित्य ठाकरे

महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात महिला, पर्यावरण यांसाठी महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने मुंबईसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या या अर्थसंकल्पातून दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाचे संकट असल्याने हा अर्थसंकल्प ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आला.

शिक्षण विभागाचा या वर्षीचा ३ सहस्र ३७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिकेचे सहआयुक्त अजित कुमार यांनी शिक्षण समितीला सादर केला. कार्यानुभव शिक्षण ऑनलाईन, टॉय लायब्ररी, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ‘ई वाचनालय’, डिजिटल क्लासरूम, टॅब, असा डिजिटल शिक्षणावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे.