‘प्रसादा’ला नाही कसे म्हणायचे ?’ असे सांगत लाचखोरीचे केले समर्थन !
अशा निर्लज्ज लाचखोरांना फाशीची शिक्षा झाली, तरच देशातील भ्रष्टाचार न्यून होईल !
जयपूर (राजस्थान) – जयपूर विकास प्राधिकरणाच्या उपायुक्त ममता यादव यांना एका भूमीच्या व्यवहारासाठी साडेनऊ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. यादव यांना अटक करण्यात येत असतांना प्रसारमाध्यमेही पोचल होते. त्या वेळी यादव त्यांच्या खुर्चीत बसून निर्लज्जपणे हसत होत्या. त्यांचे छायाचित्र काढण्यात येत असतांना यादव म्हणाल्या, ‘कुणी ‘प्रसाद’ अर्पण करण्यासाठी येत असेल, तर त्याला नाही म्हणू शकत नाही.’ या प्रकरणी एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे.