छत्रपती संभाजीनगर येथील सैनिक सैन्यातून १३ वर्षांपासून बेपत्ता !

सैन्यातून वर्ष २०१० पासून बेपत्ता झालेले सैनिक रवींद्र भागवत पाटील यांचा शोध घेऊन त्याला सोपवावे, अशी मागणी हरवलेल्या सैनिकाचे माता-पिता यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.

सिंधुदुर्ग : केर, मोर्ले ग्रामस्थांचे २५ मे या दिवशीचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

केर, मोर्ले परिसरात हत्तींची समस्या जटील झाली आहे. येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्तींना हटवणे, तसेच अन्य मागण्यांविषयी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत.

कराड येथील गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी कार्यरत असणार्‍या नगरपरिषदेच्या विरोधात ‘गोरक्षण बचाव समिती’चे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण !

गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी गोप्रेमींच्या महाराष्ट्रात करण्यात येणारी दडपशाही संतापजनक !

इंद्रायणीतील प्रदूषण रोखण्‍यासाठी ‘इंद्रायणी सेवा फाउंडेशन’चे आळंदीत साखळी उपोषण !

इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि पात्रातील प्रदूषण रोखण्‍यासाठी, तसेच ते करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्‍यासाठी येथील संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या समाधी मंदिरासमोर महाद्वारात साखळी उपोषण चालू केले आहे.

सिंधुदुर्ग : यशवंतगडाजवळ अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी १० जणांना एकूण २६ लाख रुपये दंड !

शिवप्रेमींच्या लढ्याला प्राथमिक यश ! वेंगुर्ला तहसीलदारांची संबंधितांना नोटीस १५ दिवसांत दंड न भरल्यास सक्तीने वसूल करण्याची दिली चेतावणी !

ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले !

सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर येथे ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले.

मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण चालूच ठेवणार ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

मागील १० दिवसांपासून ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांचे आमरण उपोषण चालू आहे.

मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण चालूच ठेवणार ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

सरकारने लोटे येथील ‘श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळे’ला उर्वरित अनुदान द्यावे, तसेच गोशाळेच्या जागेचा प्रश्‍न सोडवावा, या मागण्यांची पूर्तता जोपर्यंत केली जात नाही, तोपर्यंत मी उपोषण चालूच ठेवणार आहे.

मदरशाच्या नावाखाली अवैध बांधकाम : कार्ला (जिल्हा पुणे) ग्रामस्थांचेे उपोषण !

ग्रामस्थांना असे उपोषण करावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! अवैध बांधकाम होऊ देणार्‍या आणि ते निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांना सरकारने तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे !

सिंधुदुर्ग : सासोली ग्रामस्थांच्या भूमी लाटण्याचा बांधकाम व्यावसायिकाचा प्रयत्न उघड !

‘या प्रकाराची तात्काळ नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.