|

चिपळूण (रत्नागिरी) – सरकारने लोटे येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळे’ला उर्वरित अनुदान द्यावे, तसेच गोशाळेच्या जागेचा प्रश्न सोडवावा, या मागण्यांची पूर्तता जोपर्यंत केली जात नाही, तोपर्यंत मी उपोषण चालूच ठेवणार आहे, असा निर्धार ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी व्यक्त केला. मागील १० दिवसांपासून ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांचे आमरण उपोषण चालू आहे.
ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांच्या उपोषणाकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही दुर्लक्ष केल्यामुळे महाराज १९ एप्रिल या दिवशी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोशाळेतील सहस्रो गोमाता सोडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार होते; मात्र खेड पोलिसांनी त्यांना कह्यात घेऊन हे आंदोलन रोखले.
ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना खेड येथील कळंबोली शासकीय रुग्णालयात भरती केले होते. तेथे उपचार करण्यास नकार देत ह.भ.प. भगवान महाराज कोकरे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !