मुख्यमंत्री गेहलोत भ्रष्टाचारी भाजपवाल्यांना पाठीशी घालत आहेत ! – काँग्रेसला घरचा आहेर

काँग्रेस सरकार भ्रष्टाचार्‍यांच्या नेहमीच पाठीशी असते, हे बोफोर्स, २-जी, कोळसा, राष्ट्रकुल, आदर्श अशा अनेक घोटाळ्यांत दिसून आले आहे. त्याविषयी सचिन पायलट आणि अन्य काँग्रेसी कधी तोंड उघडत नाहीत !

सिंधुदुर्ग : प्रशासनाच्या आश्वासनानंतर वानोशी येथील पाण्यासाठीचे उपोषण स्थगित !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागणे, ही प्रशासनाची निष्क्रीयताच !

विधानभवनाच्या पायर्‍या सोडून अन्यत्र उपोषण करण्याची प्रथा नको ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघातील पाणी योजनेचे ५० टक्के रखडलेले काम चालू करावे, या मागणीसाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण चालू केले आहे.

आज अंगणवाडी सेविकांचा पुणे येथे मोर्चा आणि लाक्षणिक उपोषण !

अंगणवाडीत मदतनीस म्‍हणून नियुक्‍तीसाठी दहावी ऐवजी बारावी परीक्षा उत्तीर्ण तसेच मुख्‍यसेविका म्‍हणजे पर्यवेक्षक पदभरतीसाठी सेविकेचे कमाल वय ४५ वर्षे अशा अटी प्रशासनाने समाविष्‍ट केल्‍या आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे ‘औरंगाबाद’ नामकरण करण्यासाठीच्या उपोषणात झळकावली औरंगजेबाची भित्तीपत्रके !

छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारणारा आणि लक्षावधी हिंदूंची क्रूर हत्या अन् सहस्रों मंदिरांचा विध्वंस करणारा औरंगजेब इम्तियाज जलील यांना किती ‘प्रिय’ आहे, हे या उपोषणावरून लक्षात येते.

रेडी (सिंधुदुर्ग) येथील यशवंतगडाजवळ शिवप्रेमींवर बेमुदत उपोषणाची वेळ !

यशवंतगडाच्‍या तटबंदीला लागून अवैधरित्‍या करण्‍यात आलेले उत्‍खनन आणि आर्.सी.सी. बांधकाम यांना उत्तरदायी असलेल्‍या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील शिवप्रेमी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 

सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाजवळ आजपासून बेमुदत उपोषण !

अनधिकृत बांधकामापासून गडाचे संरक्षण होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शिवप्रेमींना वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून सी.आर्.पी.सी. कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली, हे दुर्दैवी आहे.

हिंगोली येथे शेतकर्‍यांकडून रस्‍त्‍यावर दूध ओतून संताप व्‍यक्‍त !

पीक विमा न मिळाल्‍याच्‍या निषेधार्थ जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांनी चालू केलेले आमरण उपोषण सहाव्‍या दिवशीही चालूच होते. या काळात केलेली आंदोलने आणि शेतकर्‍यांकडून चालू असलेल्‍या उपोषणाची प्रशासनाकडून अपेक्षित नोंद घेतली जात नसल्‍याने शेतकरी संतप्‍त झाले आहेत.

कुडाळ येथील ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी आतंकवादी संघटनेच्या समर्थकांना हाकलून द्या ! – अधिवक्ता राजीव बिले, कुडाळ

ही सामाजिक संस्था असेल, असे वाटले होते; मात्र याविषयी मिळालेल्या माहितीवरून ही इस्लामी संघटना नसून ती पाकिस्तानी आतंकवादी संघटना असल्याचे लक्षात आले.

सीबीआयद्वारे हिंदु नेत्याच्या हत्येचे अन्वेषण करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने कुटुंबियांचे उपोषण

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या हिंदुद्रोही पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे !