मदरशाच्या नावाखाली अवैध बांधकाम : कार्ला (जिल्हा पुणे) ग्रामस्थांचेे उपोषण !

प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या पत्राला केराची टोपली !

ग्रामस्थांनी सुरु केलेले उपोषण

कार्ला (जिल्हा पुणे) – येथील गट क्रमांक १४८ मधील रहमत मशिदीच्या मागील जागेत मदरशाच्या नावाखाली अवैध इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. याच परिसरात शाळा, महाविद्यालय आणि श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर असल्याने सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर बांधकाम ग्रामपंचायतीच्या अनुमतीविना करण्यात आले आहे. त्यामुळे याविरोधात ग्रामस्थांनी २६ जानेवारीला ग्रामसभा घेऊन सदर अवैध बांधकाम पाडण्याचा ठराव एकमताने संमत केला. यासह ग्रामपंचायतीने या प्रकरणी पुणे महानगर प्रादेशिक नियोजन प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.), जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस आदींना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली. तथापि अद्यापपर्यंत याविषयी संबंधित यंत्रणांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने पी.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाचा निषेध करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच आवारात ११ एप्रिलपासून उपोषण चालू केले. ‘जोपर्यंत हा प्रश्‍न निकाली निघणार नाही, तोपर्यंत उपोषण चालू राहील’, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

  • ग्रामस्थांना असे उपोषण करावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! अवैध बांधकाम होऊ देणार्‍या आणि ते निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांना सरकारने तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे ! यासह असे अवैध बांधकाम करणार्‍यांवरही कठोर कारवाई केली पाहिजे !