‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपट करमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकार्‍यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विस्थापित काश्मिरी हिंदु बांधवांना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आरक्षण घोषित करण्यात आले होते.

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात विविध हिंदु संघटनांचे ध्येय ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ असल्याचा पुनरुच्चार !

कोरोनाच्या २ वर्षांच्या कालावधीनंतर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमच अधिवेशन घेण्यात आले. हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींनी हिंदु राष्ट्राची स्थापना हेच त्यांचे ध्येय असल्याचे अधोरेखित केले, हे अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले.

अमरावती येथे मोठ्या प्रमाणात हिंदूसंघटनासाठी प्रयत्न करण्याचा संत, हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक यांचा निश्चय !

अमरावती जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा संपर्क दौरा नुकताच पार पडला. यामध्ये विविध संप्रदायांचे संत, हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक यांच्या भेटी घेण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले.

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! धार्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला महाराष्ट्र राज्यातही ‘करमुक्त’ करण्याची घोषणा करावी आणि काश्मिरी हिंदूंप्रती सरकारची सहवेदना दर्शवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.  

धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जात असल्याने ते रोखण्यासाठी हिंदु धर्माचा प्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माचा प्रसार सर्वत्र करून धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.

कोपरगाव (जिल्हा नाशिक) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट अखेर प्रदर्शित होणार !

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला जात नसल्याने येथील हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात ‘सुदेश पिक्चर पॅलेस’ या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे याविषयी जोरदार मागणी करून हा चित्रपट प्रदर्शित करण्यास भाग पाडले आहे.

कोल्हापूर येथे होणार अखिल भारत हिंदु महासभेचे महाधिवेशन !

कोल्हापूर येथे तब्बल १४ वर्षांनंतर होणार्‍या या महाधिवेशनामुळे जिल्ह्यातील हिंदु महासभेचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यात आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थान येथील ‘ई-पास’ची सक्ती रहित !

जोतिबा देवस्थान येथील हक्कदार पुजारी, गुरव समाज, ग्रामस्थ, भाविक यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनाचे संघटित यश !

लेखकांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करणारे पुस्तक मागे घेतले !

विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्याने दिलेल्या नोटिसीचा आणि प्रविष्ट केलेल्या तक्रारीचा परिणाम ! या लेखकांचे अन्य धर्मियांच्या संघटनांविषयी अशा प्रकारे लिहिण्याचे धाडस झाले असते का ?