कोल्हापूर येथे होणार अखिल भारत हिंदु महासभेचे महाधिवेशन !

१४ वर्षांनंतर ७ आणि ८ मे २०२२ या कालावधीत अधिवेशन

सातारा, १४ मार्च (वार्ता.) – अखिल भारत हिंदु महासभेचे महाधिवेशन ७ आणि ८ मे २०२२ या कालावधीत कोल्हापूर येथे होणार आहे. कोल्हापूर येथे तब्बल १४ वर्षांनंतर होणार्‍या या महाधिवेशनामुळे जिल्ह्यातील हिंदु महासभेचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यात आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती महासभेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह गायकवाड (सरकार) यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्हा नेहमीच संवेदनशील राहिला आहे. सत्ताधिशांवर अंकुश ठेवण्याचे काम कोल्हापूरवासियांनी सतत केले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नजरकैदेतून मुक्त झाल्यानंतर कोल्हापूर येथे शिवछत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक होत अखिल भारत हिंदु महासेभत प्रवेश केला. तेव्हा चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची कोल्हापूर हिंदु महासभा जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली होती. यापूर्वी वर्ष २००८ मध्ये कोल्हापूर येथे हिंदु महासभेचे अधिवेशन पार पडले होते. तब्बल १४ वर्षांनंतर हा सुवर्णयोग्य पुन्हा कोल्हापूरवासियांना अनुभवायला मिळणार आहे.’’