हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात रामराज्य स्थापनेचा निर्धार !
वाराणसी येथे हिंदूंचे संघटन होण्यासाठी चैत्र शुक्ल नवमी अर्थात् रामनवमी या पावन दिनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. या शोभायात्रेत अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांनी सहभागी होऊन हिंदु एकतेचे दर्शन घडवले.