केरळ सरकार नियंत्रित गुरुवायूर मंदिरात उदयस्थमन पूजा न करण्याच्या निर्णयाविषयी सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा !

मंदिरात चाललेल्या प्रथा, परंपरा आणि पूजापद्धत यांचे पालन करणे, हे सरकारनियुक्त मंदिर समितीचे कर्तव्य आहे. त्यासाठी मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केली पाहिजेत.’

जवाहरलाल नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांच्यातील पत्रांचा घोळ !

‘प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड मेमोरियल (नेहरू म्युझियम मेमोरियल) तीन मूर्ती भवन, नवी देहली येथे असलेली जवाहरलाल नेहरू आणि लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना यांच्यातील पत्रे वर्ष २००८ मध्ये सोनिया गांधी यांनी त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातून मागवून घेतली आणि गायब केली.

देशाच्‍या सार्वभौमत्‍वाला विरोधी पक्षांचा सुरूंग !

‘भारतात मोदी सरकार आणि विविध राज्‍यांमध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकारे येण्‍यापूर्वी हिंदूंच्‍या प्रत्‍येक सणांना आतंकवादी आक्रमणाचे भय असायचे. एवढेच नाही, तर १५ ऑगस्‍टचा स्‍वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारीचा प्रजासत्ताकदिन या राष्‍ट्रीय सणांच्‍या दिवसांवरही नेहमीच जिहादी आक्रमणांचे सावट असायचे.

उत्तरप्रदेशमधील अलाहबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या सत्यवचनांचे पडसाद !

विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यक्रमात न्‍यायमूर्ती शेखर यादव यांनी भाष्‍य केल्‍यानंतर पुरोगाम्‍यांनी सगळा देश डोक्‍यावर घेतला ! कपिल सिब्‍बल यांनी महाभियोग प्रस्‍तावाची चेतावणी दिली. धर्मांधांसाठी आपला किती जिव्‍हाळा आहे, हे दाखवण्‍याचा त्‍यांचा प्रयत्न दिसून येतो.

एकगठ्ठा व्होट बँकेचा ‘व्होट (मतदान) जिहाद’!

व्होट स्कॅम (घोटाळा) जिहाद’ प्रकार नव्याने उघडकीस आला आहे. ही गोष्ट अतिशय गंभीर असून यात स्थानिक धर्मांध, संस्था, व्यक्ती आणि संघटना यांचा किती सहभाग आहे ?, याचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषण करावे, असे हिंदु मतदारांना वाटते.

‘व्‍होट जिहाद’ला (मतदान जिहादला) ‘धर्मयुद्धा’ने उत्तर !

‘महाराष्‍ट्र विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी मतदाराला संबोधित करतांना देवेंद्र फडणवीस यांनी  ‘व्‍होट जिहाद’ला हरवण्‍यासाठी धर्मयुद्ध करण्‍याचे आवाहन केले होते. त्‍यावरून पुरोगाम्‍यांनी एकच काहूर माजवले आणि ‘भाजपचा उत्तरदायी नेता अशा प्रकारची…

आरक्षणासाठी फसवणूक करणार्‍या धर्मांतरितांविरुद्ध मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

पुढारलेले ख्रिस्‍ती पंथीय म्‍हणून समाजात वावरायचे; परंतु अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास भटके आणि विमुक्‍त जाती यांच्‍या सवलतीही मिळवायच्‍या, हे गेली ७० वर्षे चालू आहे.

विद्यार्थ्‍यांना गीतेतील तत्त्वज्ञान शिकवण्‍याविषयी गुजरात उच्‍च न्‍यायालयाचा दृष्‍टीकोन !

न्‍यायमूर्ती म्‍हणाले, ‘गीता धर्मनिरपेक्षता, नैतिकता, संस्‍कृती आणि विज्ञान हे तटस्‍थपणे शिकवते. त्‍याला धर्माचे रूप देण्‍याएवढे मर्यादित स्‍वरूप देणे चुकीचे ठरेल. गीता शिकवणे, हा धार्मिक पक्षपात नाही. यात कुठलेही धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन होत नाही.’

जामिया मिलिया विद्यापिठात हिंदूंशी भेदभाव आणि त्‍यांच्‍या धर्मांतराचा प्रयत्न होत असल्‍याचा सत्‍यशोधन समितीचा अहवाल !

या विद्यापिठाचे प्रशासन मुसलमानांच्‍या कह्यात आहे. ते म्‍हणतात, ‘पक्‍के पुरावे द्या, तर आम्‍ही चौकशी करू.’ येथे प्रश्‍न केवळ चौकशी करण्‍याचा नाही, तर अशा गुन्‍हेगारी वृत्तीच्‍या लोकांविरुद्ध फौजदारी चौकशी करून कठोर कारवाई करण्‍याचा आहे.

हिंदूंचा आत्मसन्मान वाढवणारा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल !

‘महाराष्ट्र विधानसभेचे नुकतेच निकाल घोषित झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्ष मिळून २३० आमदार निवडून आले अन् महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेने हिंदुत्वनिष्ठ महायुतीला एक अभूतपूर्व यश दिले.