सध्या ऊन वाढत असल्याने शरिराला थंडावा म्हणून कित्येक जण सब्जा खात आहेत. सध्या वसंत ऋतू चालू आहे. हा निसर्गतः कफ वाढण्याचा काळ असल्याने नियमितपणे सब्जा खाणार्यांना सर्दी-खोकल्याचे त्रास बळावू शकतात. सब्जा हा पचायला जड आहे.
नियमितपणे खाल्ल्यास उन्हामुळे आधीच न्यून झालेली भूक आणखीच मंदावते. त्यामुळे जे नियमित व्यायाम करतात, ज्यांची भूक आणि पचनशक्ती उत्तम आहे, त्यांनी सब्जा खाण्यास हरकत नाही. इतरांनी मात्र क्वचित् कधीतरी आणि अल्प मात्रेत सेवन करणेच योग्य !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (२.४.२०२४)