ताक थंड आणि प्रकृतीला चांगले म्हणून ते उन्हाळ्यात सतत पिऊ नका !

‘एका रुग्णाने सांगितले, ‘‘डॉक्टर तुम्ही ताक एकदम न्यून करायला सांगितले आणि माझ्या पचनाच्या निगडित आंबट घशाशी येणे, जळजळ या तक्रारी पूर्णच थांबल्या. ताकानेही त्रास होतो, हे ठाऊक नव्हते. ते प्रकृतीला चांगले असते, उत्तम ‘प्रो-बायोटिक्स’ (मानवी शरिराला लाभदायक सूक्ष्मजीवांना ‘प्रो-बायोटिक्स’ म्हणतात.) आहे. त्यामुळे कायम भरपूर प्यावे, असेच वाचले होते.’’

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

त्यावर त्याला सांगितले, ‘‘खरे तर ताक स्वभावाने उष्ण आहे. ताक कधी पिऊ नये’, याचे स्पष्ट उल्लेख आहेत. उष्ण काळात, दाह, जळजळ लक्षणे असतांना ताक पिऊ नये. ‘प्रो-बायोटिक’ म्हणून विचार कराल, तर यामध्ये सगळे आंबवलेले पदार्थही येतात. या कशाचाही अतिरेक किंवा त्याचे सातत्य विशेषतः कोरड्या प्रदेशातील लोकांना त्रासदायक ठरते. या सर्वच पदार्थांचा एक स्वभाव बघता ते पित्तकर आहेत. जेवणासह किंवा त्याला लागून थोड्या प्रमाणात ताक पिणे हे योग्य. स्पर्शाला थंड आणि चवीला छान म्हणून पेलाभर ताक उन्हाळ्यात किंवा उष्ण प्रकृती अथवा पित्ताचे त्रास असतांना भुकेल्या पोटी पिणे शरिरात पित्त वाढवणार हे नक्की ! व्यक्ती, पदार्थ आणि प्रमाण यांचा ताळमेळ नीट पाहिजे, तर तो पदार्थ लागू पडतो.’

एका वाक्यात सांगायचे, तर ‘उन्हाळा चालू झाला आहे. ताक थंड असते आणि प्रकृतीला चांगले म्हणून पुष्कळ ताक सतत पिऊ नका.’

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे (२६.३.२०२४)

(वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये यांच्या फेसबुकवरून साभार)