सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. नामजप ही व्यष्टी साधना आहे आणि सेवा ही समष्टी साधना आहे ! सेवेला प्राधान्य देणे आवश्यक !

श्री. सुनील निनावे : मी नामजप करत असतांना माझ्या मनात सेवेसंबंधी विचार असतात, अन्य विचार नसतात. माझ्या मनात ‘सेवा आणखी चांगली कशी करू शकतो ? सेवेत आणखी काय पालट करायला हवेत ?’, असे विचार असतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘नामजप करायचा कि सेवेचे विचार करायचे ?’, असे कुणाला वाटले, तर नामजप ही व्यष्टी साधना आहे आणि सेवा ही समष्टी साधना आहे. सेवेला प्राधान्य द्यायचे.
२. सेवेविषयी तेच तेच विचार मनात आले, तर नामजप करायचा !
श्री. सुनील निनावे : पुष्कळ वेळा माझ्या मनात सेवेसंबंधी विचार अधिक प्रमाणात येतात. माझ्या मनात अन्य विचार नसतात. माझे नामजपाकडे लक्ष नसते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : चांगले आहे; पण ‘सेवेसंबंधी नवीन काय करायचे ? कसे करायचे ?’, असे तेच तेच विचार मनात आले, तर नामजप करायचा.
३. आपण देवाला साहाय्यासाठी रात्रं-दिवस कधीही हाक मारतो, आपल्याला देवासारखे व्हायचे आहे, म्हणजे रात्रं-दिवस सेवा करायला हवी !
श्री. सुनील निनावे : मी ‘प्लंबिंग’ची सेवा करतो. काही वेळा मला रात्री-अपरात्री सेवेसाठी बोलावतात. तेव्हा मला पुष्कळ त्रास व्हायचा. मला वाटत असे, ‘हे आता कशाला सांगायला हवे ?’; पण आता माझ्याकडून लगेच स्वीकारले जाते. त्या वेळी माझा ‘ही माझी सेवा आहे. ती करायलाच हवी. आपल्याला देवाने त्यासाठीच येथे आणले आहे’, असा विचार होऊन सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न होतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपण देवाला कधीही हाक मारतो ना. आपल्याला देवासारखे व्हायचे, म्हणजे सेवा करायलाच हवी. दिवस-रात्र कधीही.
श्री. सुनील निनावे : हो. माझ्या मनात ‘मी साधकांच्या सेवेसाठी आलो आहे, तर माझ्याकडून त्यांची सेवा व्हावी’, असा विचार येतो.