गेल्या जन्मी ज्याने साधना केली, त्यालाच या जन्मात साधना करावीशी वाटते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री. हर्षद खानविलकर : प्रसारात असतांना असे अनुभवयाला मिळते की, आई-वडील सेवा करत असतात; पण त्यांनी मुलांना तेवढे साधनेसाठी तयार केलेले नसते. तो संस्कार करण्यामध्ये कुठेतरी किंवा संस्कारांपेक्षा साधनेचे महत्त्व सांगण्यात ते उणे पडलेले असतात. मुलांनी साधना करावी हा विचार पालकांमध्ये थोडा अल्प जाणवतो. त्या संदर्भात असे वाटते, ‘मुलांची इच्छा असते; पण आई-वडिलांचा कल ‘मुलांनी शिकले पाहिजे, त्यांनी चाकरी (नोकरी) करायला पाहिजे’, याकडे असतो.’ अशा वेळी काय करावे ?

श्री. हर्षद खानविलकर

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधना मार्ग’ हे ऐकलंय ना ? त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्य साधनेत येईल असे काही नसते; म्हणूनच तुमच्या कुटुंबाचे कौतुक आहे, सगळे एकत्र आले. गेल्या जन्मी ज्याने साधना केली असेल, त्यालाच या जन्मी ती करावी वाटते; म्हणून बाकीच्यांचे विचार आपण सोडून द्यायचे.