जनुकीय परिवर्तीत अन्नपदार्थ आरोग्याला हानीकारक असल्याने सेंद्रिय अन्नपदार्थांना प्राधान्य द्या ! – आरोग्य साहाय्य समिती

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मागवलेल्या अभिप्रायांनुसार केंद्रीय आरोग्य अन् कुटुंब कल्याण मंत्रालयाला ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने निवेदन

‘डायोसेसन’ संस्थेत ‘क’ श्रेणीतील पदासाठी लेखी परीक्षा घेणे बंधनकारक असल्याच्या राज्य सरकारच्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान

सर्व शिक्षण संस्थांना लागू असलेले नियम डायोसेसनलाही लागू केल्यास चुकीचे ते काय ? अनुदान घ्यायचे; पण नोकरभरती आपल्या पद्धतीने करायची, याला काय म्हणायचे ?

भारतात आरक्षणप्रणाली नसती, तर भारतातच शिकून आधुनिक वैद्य झाले असते !

भारतात केवळ १० वर्षे आरक्षणाची पद्धत राबवण्याची सूचना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती, हे आपण लक्षात घ्यायला हवे !

कळंगुट येथील निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर छापा

कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या पशूवधगृहावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी ७१ टिन कॅन (डबे) कॅटल फॅट, हाडे, हुक, गॅस बर्नर, शिंगे आणि हत्यारे कह्यात घेतली आहेत.

शिवजयंतीनिमित्त फोंड्यात निघालेल्या भव्य शिवमहारथ यात्रेत ५ सहस्र शिवप्रेमींचा सहभाग

भगव्या ध्वजांसह फेटे घालून युवक, महिला आणि लहान मुले यांसह ५ सहस्र शिवप्रेमी या यात्रेत सहभागी झाले होते.

काणकोण तालुक्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक डॉ. पुंडलिक गायतोंडे यांचे कार्य विस्मृतीत जाण्याची चिन्हे

आजची पिढी, सरकारी यंत्रणा आणि काणकोणवासीय यांना डॉ. गायतोंडे यांच्या त्यागाचा हळूहळू विसर पडत चालला आहे. यंदा गोवा मुक्तीचे ६० वे वर्षे साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीच्या निमित्ताने . . .

पुणे येथील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

भाजपचे पुणे येथील आमदार श्री. सुनील कांबळे यांनी १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे आणि काही कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते.

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

या वेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, ‘‘तुमच्याकडे राष्ट्र आणि धर्म यांच्यासंदर्भात काही विषय असतील, तर आम्हाला द्या. आम्ही ते पुढे नेऊ. तुम्हाला कधीही साहाय्य लागले, तर सांगा. आम्ही ते करण्यास सिद्ध आहोत.

माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

नवी मुंबई येथील माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली.

भारतातील लज्जास्पद लोकशाही !

‘गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या ३०१ पैकी ८९ म्हणजे २६.५७ टक्के उमेदवारांवर गुन्हे नोंद झालेले आहेत.