हिंदु धर्मातील ज्ञान सर्वत्र पोचवण्याचे सनातनचे कार्य अतिशय चांगले ! – श्री. सुनील कांबळे

रामनाथी (फोंडा, गोवा) – भाजपचे पुणे येथील आमदार श्री. सुनील कांबळे यांनी १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे आणि काही कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते. सनातन आश्रमातील साधक श्री. सागर निंबाळकर यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्मविषयक कार्य, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे कार्य आदींविषयी त्यांना सविस्तर माहिती दिली.
सनातनच्या आश्रमात चालणारे कार्य पाहून आमदार श्री. सुनील कांबळे म्हणाले, ‘‘आश्रमात चालू असलेले कार्य उत्तम आहे. आश्रमात हिंदु धर्मातील ज्ञान सर्वत्र पोचवण्याचे सनातनचे कार्य अतिशय चांगले आहे. आश्रमातील साधकांचा सेवाभाव पुष्कळ चांगला आहे. प्रसारसाहित्य करतांना समाजाला सात्त्विकतेकडे नेण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे, तो स्तुत्य आहे.’’
या वेळी ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी आमदार श्री. कांबळे यांना भेटवस्तू आणि ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यासह डॉ. श्रीपाद ढेकणे यांनाही भेटवस्तू आणि ‘धर्मशिक्षण फलक’ ग्रंथ भेट देऊन त्यांचाही सत्कार केला.
या वेळी डॉ. श्रीपाद ढेकणे यांनीही ‘आश्रम पाहून अत्यंत प्रसन्नतेची अनुभूती आली, तसेच आश्रमातून हिंदुत्वाविषयी बर्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि आम्हाला आनंद मिळाला’, असा अभिप्राय दिला. अशाच प्रकारचा अभिप्राय उपस्थित अन्य कार्यकर्त्यांनीही दिला.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात