सनातन संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विविध पक्षांचे आमदार यांचे अभिनंदन

सनातन संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विविध पक्षांचे आमदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

गोव्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १ एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायद्यानुसार ११ पटींनी अधिक दंड

सुधारित नवीन मोटर वाहन कायद्याची गोव्यात १ एप्रिलपासून कार्यवाही करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. नवीन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यास पूर्वीच्या तुलनेत ६ ते ११ पटींनी अधिक दंड ठोठावला जाणार आहे.

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे विधान म्हणजे काश्मीरमध्ये अनन्वित अत्याचार सहन केलेल्या हिंदूंचा अवमान ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

मुख्यमंत्री केजरीवाल काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित या चित्रपटावर हास्यविनोद करतांना ही दिसत आहेत. हा त्यांचा निर्दयीपणाच आहे !

साळगाव येथे नायजेरियाच्या नागरिकाकडून ६७ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

अमली पदार्थविरोधी पथकाने २३ मार्च या दिवशी साळगाव येथील एका मद्यालयावर धाड टाकून नायजेरियाचा नागरिक ओनये लकी याच्याकडून ६६ लक्ष ९५ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले.

आता ‘गोवा इन्क्विझिशन’वर आधारित ‘द गोवा फाइल्स’ चित्रपटाची निर्मिती व्हावी ! – प्रा. सुभाष वेलींगकर, हिंदुत्वनिष्ठ

३२ वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला होता. त्या वेळी काँग्रेसधार्जिण्या विचारधारेमुळे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटली नाही.

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपकडून पुन्हा डॉ. प्रमोद सावंत यांची निवड : राज्यपालांकडे केला सरकार स्थापनेचा दावा

‘भावी मुख्यमंत्री कोण ?’ याविषयी राज्यातील गेले काही दिवस चाललेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. यानंतर भाजप सायंकाळी उशिरापर्यंत राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची भेट घेऊन गोव्यात सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.

मुलुंड, मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक मंदार गाडगीळ यांचा ‘एल्.टी.आय.’ आस्थापनाकडून ‘स्पार्टन’ (‘योद्धा’) ही उपाधी देऊन गौरव !

श्री. मंदार गाडगीळ हे ‘एल् अँड टी. (लार्सन अँड टुब्रो) इन्फोटेक’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनामध्ये ‘महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर)’ या पदावर चाकरीला आहेत.

आनंदी आणि श्रीविठ्ठलाविषयी भोळाभाव असणारे ईश्वरपूर (सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

आनंदी, हसतमुख आणि भोळ्या भावाने श्रीविठ्ठलभक्तीत रममाण झालेले ईश्वरपूर (इस्लामपूर, सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले.

गोव्यात सत्तास्थापनेसाठी मगोप आणि अपक्ष यांना समवेत घेणार ! – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ते पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात मी नसतांनाही कामे झाली. भलेही थोड्याशा मतांनी विजयी झालो असलो, तरी माझ्या जिंकण्याचे संपूर्ण श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना, तसेच माझ्या पक्षाला जाते.

शिवोली येथील वसंत विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून नाईट क्लब आणि उपाहारगृहे यांतील संगीतामुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याची प्रदूषण मंडळाकडे तक्रार

रात्रभर मोठ्या आवाजात चालू असलेले संगीत प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा स्थानिक प्रशासन यांना कसे ऐकू येत नाही  ?  त्यांना बहिरे म्हणायचे का ?