१० फेब्रुवारी ते ७ मार्च या काळात ‘एक्झिट पोल’च्या प्रकाशनास बंदी !

निवडणूक आयोगाने १० फेब्रुवारी ते ७ मार्च या काळात ‘एक्झिट पोल’ (मतदानानंतरचा अंदाज) कार्यक्रम आयोजित करण्यास आणि प्रकाशित करण्यास बंदी घातली आहे. ५ राज्यांतील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

काँग्रेसच्या काळात गोव्यात सर्वाधिक घोटाळे ! – गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

काँग्रेसच्या काळात गोव्यात सर्वाधिक घोटाळे झाल्याचा आरोप आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळे लोकांनी पाहिले आहेत.

ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट !

‘गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या ३०१ पैकी ८९ म्हणजे २६.५७ टक्के उमेदवारांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. यामधील २९ जणांवरील आरोप निश्चित झाले आहेत, तर दोघांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

(म्हणे) ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रथम मतदान करा आणि नंतर प्रेम करा !’

१४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ ! पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली आणलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. याला निवडणूक आयोगाने प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे ?

गोवा शासनाकडून १४ फेब्रुवारीला सार्वजनिक सुटी घोषित

खासगी आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजंदारी कामगार, हंगामी स्वरूपात काम करणारे कर्मचारी आदींसह सर्व कर्मचार्‍यांना मतदान करता यावे, यासाठी पगारी सुटी घोषित करण्यात आली आहे.

स्थिर, त्यागी वृत्तीच्या आणि देवाप्रती श्रद्धा अन् भाव असलेल्या श्रीमती सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) सनातनच्या ११७ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !

श्रीमती सुधा उमाकांत सिंगबाळ सनातनच्या ११७ व्या संतपदी विराजमान ! त्यांच्या फोंडा येथील निवासस्थानी एका अनौपचारिक कार्यक्रमात ही मंगलमय घोषणा करण्यात आली.

चर्चिल आलेमाव यांचा देहलीच्या आर्चबिशपकडून निषेध

तृणमूल काँग्रेसचे बाणावली मतदारसंघाचे उमेदवार चर्चिल आलेमाव हे देहली येथील ‘लिटल फ्लोवर चर्च’चे बांधकाम पाडल्याच्या प्रकरणाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे

गोवा विधानसभा निवडणुकीतील ३०१ पैकी ८० उमेदवारांवर गुन्हे प्रविष्ट

२९ उमेदवारांवर आरोप निश्चित, तर दोघांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली, सर्वाधिक गुन्हे नोंद असलेले उमेदवार काँग्रेसमध्ये

निवडणुकांच्या जाहीरनाम्यात गोव्याचा ‘आत्मा’ विकसित करणारे कलम आहे का ?

एखादा जाहीरनामा मग तो राजकीय पक्षाचा असो वा एखाद्या मतदारसंघाचे कल्याण करायला आखाड्यात उतरलेला अपक्ष उमेदवाराचा असो, गोव्याच्या ‘आत्म्या’च्या विकासाकरता आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी एक तरी गोष्ट त्याच्या जाहीरनाम्यात आहे का ?; पण दुर्दैवाने अद्याप असा एकही जाहीरनामा सापडलेला नाही.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात २५० कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा ! – शैलेंद्र वेलींगकर, शिवसेना

केवळ १३१ रुपये किमतीच्या प्रति इंजेक्शनची २ सहस्र रुपये प्रति इंजेक्शनप्रमाणे एकूण १०० इंजेक्शनची खरेदी करण्यात आली.