येमेन देशात जाण्यास बंदी असूनही तेथे २ वेळा जाऊन आलेला निसार अहमद कह्यात

भारताने बंदी घातलेल्या देशात जायचे मुसलमानांचे धाडस कसे होते ? धर्मांध मुसलमान भारतातील कायदे अनेक वेळा अशा प्रकारे धाब्यावर बसवतात. त्यांच्यात राष्ट्रप्रेम नसल्याचेच हे द्योतक आहे.

‘आझादी का अमृत महोत्सव’निमित्त पणजी येथे भरवलेल्या प्रदर्शनात कुंकळ्ळीतील उठावाविषयी चुकीचा इतिहास प्रदर्शित !

कुंकळ्ळी महानायक स्मृती ट्रस्टच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध

हिंदू संघटित झाल्यासच भारत विश्वगुरु होऊ शकेल ! – प्रा. सुभाष वेलींगकर, ‘भारत माता की जय’ संघटना

पोर्तुगीजधार्जिण्यांनी देशद्रोही कृती करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. हिंदू असंघटित असल्याने ही स्थिती उद्भवली आहे. हिंदूंनी सर्वधर्मसमभाव आदी गोंडस शब्दांमध्ये न फसता हिंदू आणि देश यांविरोधी कृतींच्या विरोधात जागरूक राहावे.

सरकारी शाळांना गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक यांची नावे देणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा स्वतंत्र झाल्यानंतर ज्या ठिकाणी सर्वप्रथम ध्वज फडकावण्यात आला (जुन्या सचिवालयाजवळ), त्या ऐतिहासिक ध्वजस्तंभावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी अमृत महोत्सवी राष्ट्रध्वज फडकावला.

गोवा : जिहाद्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय.वर बंदी घाला !

देशभरात होणार्‍या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय.आणि एस्.डी.पी.आय.या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

गोवा : सर्वण येथील श्री सातेरी मंदिरातून सुवर्णालंकारासह २ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज पळवला

देवीच्या अंगावरील मंगळसूत्र आणि नथ, मंदिरातील समया, घंटा आदी वस्तू चोरल्या. चोरांनी दानपेटीला हात लावला नाही. मंदिर समितीने याविषयी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे आणि पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.

गोवा : नागरी पुरवठा खात्याचे तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक निलंबित

नासाडी झालेल्या तूरडाळीची किंमत सुमारे २ कोटी ८६ सहस्र रुपये होते, तसेच सुमारे १० टन साखरेची नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात नासाडी झाली.

राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेले ‘मास्क’, ‘टी-शर्ट’ आदींची विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर कारवाई करा ! – सुराज्य अभियान

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

गोव्यात पंचायत निवडणुकीत ७८.७० टक्के मतदान

राज्यातील १९१ पैकी १८६ पंचायतींसाठी १० ऑगस्ट या दिवशी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले. राज्यात एकूण ७८.७० टक्के मतदान झाले.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविषयी आक्षेपार्ह ‘लिंक’ सामाजिक माध्यमातून हटवल्याची ‘गूगल’ने न्यायालयाला दिली माहिती !

यासाठी काँग्रेसचे संबंधित केंद्रीय नेते आणि गोव्यातील नेते सार्वजनिकरित्या क्षमा मागतील का ? तेवढे औदार्य ते दाखवू शकतील का ?