गणेशोत्सव मद्यमुक्त झाला पहिजे ! – खासदार गिरीश बापट

देण्याची प्रवृत्ती असेल, तर समाज सुखी होईल, हे गणेशोत्सवातून शिकायला मिळते. गणेशोत्सव मंडळे समाजात क्रांती करतील, तसेच गणेशोत्सव हा मद्यमुक्त झाला पाहिजे. जागतिक पातळीवर गेलेला उत्सव खाली आणता कामा नये.

अनुमती देण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांची अडवणूक थांबवा ! – आमदार विजयकुमार देशमुख, भाजप

वर्षानुवर्षे श्री गणेशमूर्तींची विक्री, तसेच गौरींचे मुखवटे यांच्या विक्रीसाठी दुकानाच्या बाहेर व्यापारी ५ फुटांचा मंडप घालतात; मात्र महापालिका प्रशासन अनुमती देण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांची अडवणूक करत आहे, हा प्रकार थांबायला हवा.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

प्रवासाच्या वेळी शक्य असल्यास साधकांनी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने ठेवावीत. सहप्रवाशांना त्यांचे महत्त्व सांगून प्रसार करावा.

कर्नाटकमध्ये श्री गणेश मंडपांत श्री गणेशमूर्तीच्या शेजारी वीर सावरकरांचे छायाचित्र लावणार ! – हिंदु संघटनांचा निर्णय

गणेशोत्सवात वीर सावरकरांविषयी जनजागृती करणार ! – प्रमोद मुतालिक

नाशिक येथे गणेशोत्सव मंडळांना अनुमती शुल्क माफ !

आयुक्तांनी गणेशोत्सव मंडळांसाठी परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय २० ऑगस्ट या दिवशी घेतला असून महापालिकेत तसा ठराव करण्यात आला आहे.

गणेशभक्तांनो, ‘गणपतीला गावी जात आहे’, असे न म्हणता ‘श्री गणेशचतुर्थीसाठी गावी जात आहे’, असा योग्य शब्दप्रयोग करावा !

अनेक गणेशभक्त परगावांतून श्री गणेशचतुर्थीसाठी आपल्या गावी जातांना ‘मी गणपतीला किंवा गणपतीसाठी गावी जात आहे’, असे म्हणतात. आपण गणपतीसाठी गावी जात नसतो, तर त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो.

गणेशोत्सवात चित्रपटातील गाणी लावणे, त्यावर बिभत्स नृत्य करणे असे प्रकार बंद होणे आवश्यक ! – कालीपुत्र कालीचरण महाराज

श्रावणी सोमवार निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने कावड यात्रा !

पुणे येथे गणेशोत्सवात ५ दिवस ध्वनीवर्धक वापरण्यास अनुमती !

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सवामध्ये ४ ऐवजी ५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरण्यास अनुमती दिली असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

(म्हणे) ‘कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र खोली द्या !’

स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी  अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केल्याचा हा परिणाम आहे !

पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनुमती नाकारल्यास मनसे पद्धतीने आंदोलन !

अनेक संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेशभक्त हे निवेदनाद्वारे वारंवार आवाहन करूनही प्रशासन श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी काहीच भूमिका घोषित करत नाही, हे अनाकलनीय आहे ! हिंदूंच्या सणांविषयीच प्रशासनाची नेहमी बोटचेपी भूमिका का ?