पुणे येथे गणेशोत्सवात ५ दिवस ध्वनीवर्धक वापरण्यास अनुमती !

पुणे – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सवामध्ये ४ ऐवजी ५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरण्यास अनुमती दिली असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ३, ४, ६, ८, ९ सप्टेंबर या कालावधीत नियमांचे पालन करून ध्वनीवर्धक आणि ध्वनीक्षेपक वापरण्यास अनुमती असल्याचे आदेशात म्हटले आहे.