ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

तासगावमधील (जिल्हा सांगली) श्री गणपति पंचायतचा २४३ चा रथोत्सव उत्साहात !

तासगाव येथील श्री गणपति पंचायतचा २४३ वा रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील गणपति दीड दिवसांचा असतो आणि भव्य रथोत्सव साजरा करण्यात येतो. कोरोनामुळे २ वर्षांच्या कालखंडानंतर यंदाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

(म्हणे) ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन ओढे, नदी, तलाव आणि धरण येथे न करता हौदात करा !’

अन्य धर्मियांविषयी अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले असते का ?

नगर येथे गणेशोत्सव मंडळे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांच्या विरोधानंतर पोलिसांनी दिली मिरवणुकीस अनुमती !

बैठकीमध्ये काही गणेशोत्सव मंडळांना स्थापनादिनाच्या दिवशी मिरवणूक काढण्यास अनुमती नाकारण्यात आली आणि ‘मिरवणूक काढली, तर कारवाई करू’, असा दम देण्यात आला.

श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी पुणे येथे पाचव्या दिवसापासून फिरते हौद !

हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती खड्डे बुजवण्यासाठी, विहिरी बुजवण्यासाठी वापरल्या जातात, हा अनुभव आहे. शासनाने हे श्री गणेशमूर्तीचे विडंबन थांबवण्यासाठी, गणेशभक्तांना श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार विसर्जित करण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.

टिकली न लावता श्री गणेशाचे स्वागत करणार्‍या अभिनेत्रीच्या विज्ञापनास आक्षेप !

गणेशोत्सवाच्या औचित्यावर ‘रिलायन्स मार्ट’च्या वतीने करण्यात आलेल्या एका विज्ञापनाला विरोध होत आहे. ‘रिलायन्स मार्ट’च्या विज्ञापनात मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने टिकली न लावता श्री गणेशाचे स्वागत केल्याचे दाखवण्यात आले आहे.

श्री गणेशमूर्ती दान करण्याचे, तसेच फिरत्या हौदात विसर्जन करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन !

नैसर्गिक जलस्रोतात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन करतांनाच महापालिकेने केवळ शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे, तसेच ‘पीओपी’च्या मूर्तींचे फिरत्या हौदात विसर्जन करावे किंवा मूर्तीदान करावे, असे सांगितले आहे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी !

मूर्ती विसर्जनाचे धर्मशास्त्र पाळण्यास प्रशासनाकडून भाविकांना होणारा प्रतिबंध, हा हिंदूंवरील अन्यायच आहे !

पित्तदोष शमनासाठी गणपतिपूजन

आपल्या ऋषिमुनींचे आणि पर्यायाने सनातन वैदिक हिंदु धर्माचे अलौकिकत्व यातून पुन्हा एकदा अधोरेखित होते. इथे आपण भाद्रपद मासात करण्यात येणार्‍या गणपतिपूजनाचे शारीरिकदृष्ट्या काय महत्त्व आहे, हे जाणून घेऊया.