सोलापूर येथील श्री हिंगुलांबिका मंदिरात भक्तांनी घेतली ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ !

सोलापूर येथील ‘श्री ब्रह्मानंद गणपति समाजसेवा मंडळ ट्रस्ट’च्या वतीने मंडळामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन आणि आरती करण्यात आली.

चिंचपोकळीच्या गणेशोत्सवात महिलेची छेड काढणार्‍याला मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून चोप !

संबंधित तरुणाने महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. त्यातून ही मारहाणीची घटना घडली आहे. आम्ही पोलिसांकडे अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी केली आहे.

प्रशासनाने श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी कायदाबाह्य भूमिका न घेता सकारात्मक भूमिका घ्यावी ! – कौशिक मराठे, इचलकरंजी

ज्या श्री गणेशाची आपण मनोभावे पूजा करतो, त्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे योग्य प्रकारे भाविकांची भावना जपून करणे आवश्यक आहे.

श्री गणपति विसर्जनासंदर्भात आपल्याला हे ठाऊक आहे का ?

उत्सवाच्या दिवसांत काही कारणाने श्री गणेशमूर्ती भंगली, तर तिचे लगेच विसर्जन करावे. त्यानंतर पुन्हा श्री गणेशमूर्ती आणून पूजन करू नये.’

श्री गणेशाच्या भक्त-ऋषींच्या संदर्भातील प्रसंग आणि श्री गणेशाच्या लीला यांच्यामागील अध्यात्मशास्त्र !

३.९.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या विषयावरील लेखात आपण स्वर्गसुखाचा त्याग करणारे श्री गणेशाचे परमभक्त ‘मुद्गलऋषि’ यांची अलौकिक गणेशभक्ती आणि श्री गणेशाचे निस्सीम भक्त आणि त्यांच्याप्रमाणे सोंड असलेले भृशुंडी ऋषि यांच्या संदर्भातील सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

धारावी (मुंबई) येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केला अश्‍लील नाचगाण्याचा कार्यक्रम !

प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी असे चंगळवादी कार्यक्रम आयोजित करणारे गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशालाच फाटा देत असल्याने समाजाला धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

मुंबई येथे १० देशांच्या ‘महावाणिज्यदूतां’नी घेतले मानाच्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन !

विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्यदूतांनी शहरातील मानाच्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तीभावाने भारावलेले वातावरण पाहून ‘अद्भूत अनुभूती’ आल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने मंचावर लावलेले वीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे फलक हटवले

ईदगाह मैदानात पत्रकारांशी बोलतांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, वीर सावरकर हे महान देशभक्त आहेत, असे आयोजकांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे छायाचित्र लावले आहे. त्यात चुकीचे काय आहे ?

पिंपरी येथील खासगी वाहनांनी तिकीटांचे दर अधिक घेतल्यास कारवाई करू ! – उपप्रादेशिक परिवहन विभागाची चेतावणी

गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सवांच्या काळात शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी गर्दी करतात. त्या वेळी खासगी वाहनचालक, खासगी ट्रॅव्हल्स आस्थापने नागरिकांच्या परिस्थितीचा अपलाभ घेत अधिक दराने (दुप्पट दराने) तिकीट विक्री करतात.