तासगाव (जिल्हा सांगली), ३ सप्टेंबर (वार्ता.) – येथील श्री गणपति पंचायतचा २४३ वा रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील गणपति दीड दिवसांचा असतो आणि भव्य रथोत्सव साजरा करण्यात येतो. कोरोनामुळे २ वर्षांच्या कालखंडानंतर यंदाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गणपति मंदिर ते काशीविश्वेश्वर मंदिर असा दोरखंडांच्या साहाय्याने भाविकांनी हाताने रथ ओढला. मराठा साम्राज्याचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी वर्ष १७७९ मध्ये तासगावच्या श्री सिद्धीविनायक गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे.
Sangli Ganesh 2022 : तासगावच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन @kuldipmanepatil https://t.co/ifjaFZol3L
— ABP माझा (@abpmajhatv) September 1, 2022