(म्हणे) ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन ओढे, नदी, तलाव आणि धरण येथे न करता हौदात करा !’

पुणे जिल्हा परिषदेचे शास्त्रविरोधी आवाहन

पुणे – यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या काळात घरातील आणि सार्वजनिक ठिकाणचे निर्माल्य रस्त्यावर उघड्यावर न टाकता निर्माल्य कुंडीत टाकावे, तसेच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन ओढे, नदी, तलाव आणि धरण यांत न करता यासाठी तात्पुरते विसर्जन हौद सिद्ध करणे आणि त्यातच मूर्तीचे विसर्जन करावे. याविषयी जनजागृती करून गाव पातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेने केले आहे.

संपादकीय भूमिका 

  • अन्य धर्मियांविषयी अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले असते का ?
  • हिंदू सहिष्णू असल्यामुळे त्यांना धर्मानुसार आचरण करण्याचाही अधिकार नाही का ?