पित्तदोष शमनासाठी गणपतिपूजन

#Ganeshotsav #Ganeshotsav2022 #GaneshChaturthi #GaneshChaturthi2022 Ganesh Chaturthi गणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी गणेश चतुर्थी #Ganapati #गणपती #गणेशमूर्ती #Ganeshmurti #Ganesh #गणेश गणेश Ganesh

गणेशोत्सव २०२२

सनातन हिंदु धर्मानुसार साजरे केले जाणारे सण, उत्सव आदींचे केवळ आध्यात्मिक महत्त्व आहे, असे नाही, तर ऋतुचक्राचा विचार करून त्यांतून शारीरिक आणि मानसिक स्तरावरही लाभ होत असतो. आपल्या ऋषिमुनींचे आणि पर्यायाने सनातन वैदिक हिंदु धर्माचे अलौकिकत्व यातून पुन्हा एकदा अधोरेखित होते. प्रस्तुत लेखातून आपण भाद्रपद मासात करण्यात येणार्‍या गणपतिपूजनाचे शारीरिकदृष्ट्या काय महत्त्व आहे, हे जाणून घेऊया.

१. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये नैसर्गिकरित्या शरिरात पित्त वाढणे आणि त्यामुळे विविध शारीरिक त्रास होणे

‘सप्टेंबर-ऑक्टोबर हे २ मास एक प्रकारच्या छोट्या उन्हाळ्याचे असतात. या उन्हाळ्यात शरिराला केवळ बाहेरूनच त्रास होतो, असे नाही, तर शरिराच्या आतूनही त्रास होत असतो. हा त्रास पुढे वाढत जातो. या दिवसांत काही लोकांच्या शरिरात पित्ताचा जोर वाढतो. त्यामुळे काहींना सकाळी ९ – १० वाजता आणि सायंकाळी ४ – ५ वाजता पोटात दुखते. काहींना रात्री लवकर झोप येत नाही. काहींना शौचावाटे रक्त पडते, तर काहींना लघवीतून रक्त पडते. काही जणांच्या हाता-पायाची आग होते किंवा डोळ्यांची आग होते. काहींना घशात जळजळते आणि आंबट-कडू पित्त घशाशी येते.

२. शरिरात वाढणार्‍या या पित्ताचे शमन करण्याचा शास्त्रशुद्ध उपाय म्हणजे श्री गणेशपूजा !

प्रतिवर्षी भाद्रपद-आश्विन मासांत शरिरातील पित्तदोष वाढतो. गणपति पूजनाच्या विधींमुळे हा वाढलेला पित्तदोष न्यून होण्यासही साहाय्य होते.

अ. गणपतीची आरास, गणपतीचा प्रसाद, रात्रीचे गायनादी ललित कार्यक्रम हे सर्व पित्तदोषाच्या शमनासाठीच आहेत.

आ. गणपतीसाठी गूळ-खोबरे घालून उकडीचे मोदक किंवा करंज्या करतात. हे पदार्थही पित्तशामक आहेत.

इ. खारीक, खोबरे, खडीसाखर, बेदाणे आणि खसखस हे ५ पदार्थ कुटून प्रसाद म्हणून बनवलेले पंचखाद्य आरतीनंतर वाटतात. तेही पित्तशामकच आहे.

ई. गणपतीची सजावट करतांना केळीची पाने वापरली जातात आणि रांगोळ्या काढल्या जातात. वाळा, गुलाब, चंदन इत्यादी सुवासांचा उपयोग केला जातो. त्यानेसुद्धा पित्तदोष न्यून होण्यास साहाय्य होते.

उ. गणपतीची मूर्ती मातीची करतात. ती विसर्जन करण्यासाठी नदी किंवा समुद्र यांत आतपर्यंत पाण्यात जातात. त्यामुळेही भक्ताच्या शरिरावर पाणी या पित्तशामक द्रव्याचा अनुकूल परिणाम होतो.’

– वैद्या (सौ.) मंजिरी जोग

(संदर्भ : अज्ञात)