पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे !

पंचगंगा नदीतील वाढलेले पाणी

कोल्हापूर, ८ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी ३३ फूट ५ इंच इतकी नोंदवली गेली असून तिची वाटचाल आता ३९ फूट या इशारा (पाणी अधिक वाढल्याचे संकेत) पातळीकडे चालू आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने एकूण ५५ बंधारे पाण्याखाली आहेत. गवशी बंधार्‍यावर पाणी आल्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील काही रस्ते ओढे-नाल्यांना पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.