सिंधुदुर्ग : अतीवृष्टीमुळे महावितरणची  ३२ लाख रुपयांची हानी 

ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी वीज कर्मचारी काम करत आहेत, तरी नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. असे आवाहन महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.

राधानगरीसह अन्‍य धरणे भरल्‍याने कोल्‍हापुरात पंचगंगा नदी पुराच्‍या उंबरठ्यावर !

२४ जुलैपासून काही प्रमाणात उघडीप दिल्‍याने पंचगंगा नदीच्‍या पाण्‍याची पातळी ४० फूट ४ इंच इतकी नोंदवली गेली; मात्र राधानगरीसह अन्‍य धरणे भरल्‍याने त्‍यातून कधीही विसर्ग चालू होण्‍याची शक्‍यता असल्‍याने पंचगंगा नदी पुराच्‍या उंबरठ्यावर आहे.

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

जिल्ह्यात गेले ४ दिवस पावसाची संततधार चालूच आहे, तसेच वादळी वारेही वहात आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गोवा : डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर

राज्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस चालू आहे. डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तसेच गावांचा संपर्क तुटला आहे. बर्‍याच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात पूरस्‍थिती निर्माण होण्‍याची शक्‍यता : प्रशासनाच्‍या सतर्कतेच्‍या सूचना !

जिल्‍ह्यात सातत्‍याने होत असलेल्‍या पावसामुळे जिल्‍ह्यातील स्‍थिती गंभीर होत आहे. कोल्‍हापूर-गगनगिरी, तसेच कोल्‍हापूर-आंबोली मार्ग बंद असल्‍याने कोकणात जाण्‍यासाठीचा मार्ग बंद झाला आहे. पंचगंगा नदी आता इशारा पातळीच्‍या (३९ फूट) जवळ पोचत आली असून आज पंचगंगा नदीची पातळी ३८ फूट नोंदवली.

गोव्यात २६ जुलैपर्यंत वादळी वार्‍यासह अतिवृष्टीची चेतावणी : तिलारी धरणातील पाणी सोडले

गोव्यात पावसाने आता २ सहस्र मि.मी.चा टप्पा ओलांडला आहे आणि २०.५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. सांखळीमध्ये सर्वाधिक १७१.६ मिमी पाऊस पडला. त्यानंतर पेडणे, म्हापसा, पणजी आणि काणकोण यांचा क्रमांक लागतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे, पूल, रस्ते, डोंगर खचल्याने हानी 

जिल्ह्यात गेले ३ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेती, बागायती यांसह खासगी आणि शासकीय संपत्तीची हानी झाली आहे.

यवतमाळ येथे पुरातील ४५ जणांना वाचवण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर प्रतिकूल हवामानामुळे परतले !

अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरलेले आहे. ३५७ हेक्टरवरील पिके पाण्यात बुडाली आहेत. २५ गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अतीमुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १ व्यक्तीचा, तर ४ गुरांचा मृत्यू झाला आहे. ६ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने सध्या ३९ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

गोव्यात पावसाने ७५ इंचांचा टप्पा ओलांडला !

पेडणे आणि सत्तरी तालुक्यांतील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ घंट्यांत सरासरी ८७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून फोंडा येथे सर्वाधिक ११३ मि.मी., तर पेडणे येथे ११०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.