नवी देहली – देहलीच्या सीमेवर गेल्या ४ मासांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आता येथून निघून जात आहेत. देहलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आंदोलक शेतकरी पलायन करत असल्याचे म्हटले जात आहे. यूपी गेट परिसरात सहस्रोंच्या संख्येने शेतकरी आंदोलन करत होते; मात्र सध्या येथे ३०० ते ४०० शेतकरी आंदोलन करत असल्याचे दिसत आहेत.
‘भारतीय किसान युनियन’चे राकेश टिकैत यांनी ‘जोपर्यंत शेतकर्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील’ अशी भूमिका घेतली आहे; मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचे दिसत आहे.