कुडाळ – ‘विकेल ते पिकेल’ योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने तालुक्यातील बिबवणे येथे मुंबई-गोवा महामार्गानजीक शेतकर्यांनी उभारलेल्या कलिंगड विक्री गाळ्यांना राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन शेतकर्यांची विचारपूस केली. शेतकरी आणि कृषी विभाग राबवत असलेल्या या उपक्रमाविषयी त्यांनी कौतुक केले, तसेच ‘विकेल ते पिकेल’ योजनेची अधिकाधिक व्याप्ती वाढवण्याचे आवाहन या वेळी भुसे यांनी केले. या वेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.