वर्धा – कोरोना संकटाच्या काळातील दळणवळण बंदीत वाढ केल्याच्या निषेधार्थ येथील संतप्त झालेल्या शेतकर्यांनी तहसील कार्यालयात फळांची रास ओतून संताप व्यक्त केला. ८ ते १३ मेपर्यंत लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांत १८ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यावर त्याचे सर्वत्र पडसाद उमटलेे. आर्वीत प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी हे कृत्य केले. शेतकर्यांच्या संतप्त भावनेची नोंद घेत उपविभागीय अधिकार्यांनी बैठक घेतली. त्यात प्रतिदिन सकाळी ११ वाजेपर्यंत शेतकर्यांना फळे, भाजीपाला विकण्याची अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला.