दळणवळण बंदीमुळे ‘बागेतील केळी विक्रीसाठी कशी काढायची ?’, अशी काळजी वाटणे, त्यातच वार्‍यासह पाऊस पडणे, नामजप अन् प्रार्थना केल्यामुळे केळ्यांच्या सर्व घडांची विक्री होणे

‘दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर ‘आमच्या केळीच्या बागेतील केळी विक्रीसाठी कशी काढायची ? आपले कसे होणार ?’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. मी सनातनच्या साधिका सौ. अश्‍विनी चोरमले यांना दूरभाष करून मला वाटत असलेल्या काळजीविषयी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही काही काळजी करू नका. आपले गुरुदेव महान आहेत. तुम्ही प्रार्थना वाढवा.’’ त्यानंतर मी आणि यजमानांनी त्या दिवशी रात्री १ वाजेपर्यंत नामजप अन् प्रार्थना केली.

त्या रात्री पुष्कळ वार्‍यासह पाऊस पडला. सकाळी पाहिले; तर शेजारी असलेल्या अन्य शेतकर्‍यांच्या शेतातील केळ्याचे घड पडले होते; पण आमच्या बागेतील केळ्याचा एकही घड पडलेला नव्हता. नंतर केळ्याचे घड काढण्यासाठी व्यापारी आले आणि सर्व घडांची विक्री झाली. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांंच्या कृपेमुळे दळणवळण बंदी असूनही बागेतील केळी खरेदीला व्यापारी मिळून संपूर्ण बागेतील केळी विकली गेली. ‘ही देवाने दिलेली अनुभूती आहे’, असे माझे पतीही म्हणाले.’

– सौ. बायडाबाई पेटकर, शिरसोडी, सोलापूर. (४.५.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक