झाडांच्या उत्तम आरोग्यासाठी सुपीक मातीचे (ह्यूमसचे) महत्त्व

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘कोरोनामुळे सध्या रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व सर्वांनाच समजलेले आहे. जशी आपल्या शरिरात रोगांचा सामना करणारी यंत्रणा कार्यरत असते, तशीच झाडांनाही निसर्गाने उपजतच रोगप्रतिकारक शक्ती दिलेली असते. झाडांना उपजतच असलेली ही प्रतिकारक शक्ती नेहमी कार्यरत ठेवण्याचे काम पालापाचोळा इत्यादी कुजून बनलेली सुपीक माती (ह्यूमस) करते. त्यामुळे जोपर्यंत झाडाच्या आजूबाजूला अशा पद्धतीने सुपीक माती बनण्याची क्रिया चालू राहील, तोपर्यंत झाडांवर रोग येण्याची शक्यता

अल्प होते. ‘सुभाष पाळेकर कृषी’ या तंत्राने नैसर्गिक पद्धतीने लागवड करत असतांना झाडांच्या आजूबाजूला होणार्‍या सुपीक मातीच्या निर्मितीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा.

(१७.११.२०२२)