महाराष्ट्रात घुसखोरी करणार्‍या हत्तींना बाहेर काढणार ! – वनमंत्री

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत हत्तींचा त्रास वाढला आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आसाम आदी राज्यांतून हत्ती महाराष्ट्रात येत आहेत. गोंदियामध्ये हत्तींनी मोठ्या प्रमाणात धानशेतीची हानी केली आहे. शेतीच्या अवजारांसह हत्ती घरांचीही हानी करत आहेत. अन्य राज्यांतून येणार्‍या हत्तींना पुन्हा त्या राज्यांत पाठवण्यात येणार आहे. झारखंड आणि पश्चिम बंगाल येथून टीम बोलावून हत्तींना त्या-त्या राज्यांत पाठवण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.

वन्यप्राण्यांपासून होणार्‍या शेतपिकांच्या हानीविषयी २९ डिसेंबर या दिवशी सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीवर सुधीर मुननगंटीवार यांनी वरील उत्तर दिले. या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘यापूर्वी महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्ती नव्हते. हत्ती बुद्धीमान असतात. त्यांना रोखण्यासाठी रोखण्यासाठी कोणती योजना काढल्यास त्यांच्या लक्षात येते. त्यामुळे हत्तींना बाहेर काढणे हीच उपाययोजना आहे.’’