पिंपरी-चिंचवड महापालिकेची पर्यावरणाच्या विषयीची सहानुभूती केवळ गणेशोत्सवापुरतीच ! – दिगंबर काशिद, पर्यावरणासाठी काम करणारे कार्यकर्ते
पुणे महापालिकेच्या ढोंगी पर्यावरणवादाची ‘पोलखोल’ करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनो संघटित व्हा !
पुणे महापालिकेच्या ढोंगी पर्यावरणवादाची ‘पोलखोल’ करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनो संघटित व्हा !
कागदी लगद्यापासून (पेपर मेड) विशेषत: वर्तमानपत्रापासून सिद्ध केलेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास जलप्रदूषण होते, असे विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे कागदी लगद्यापासून केलेल्या मूर्ती पर्यावरणाला पूरक नसून उलट पर्यावरण विघातक आहेत.
केंद्रशासनाच्या वन, पर्यावरण आणि वातावरणीय पालट विभागाने पाचव्यांदा प्रसिद्ध केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावांच्या अधिसूचनेविषयीच्या मसुद्यावर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आरे’ वसाहतीतील मेट्रो कारशेडच्या कामासाठी या परिसरातील वृक्ष तोडण्यात आले होते. त्याविरोधात ३१ जुलै या दिवशी पर्यावरणप्रेमींनी आरे वसाहतीमध्ये निदर्शने केली. या आंदोलनात स्थानिक आदिवासीही सहभागी झाले होते.
ठाकरे सरकारने कामाकाजाच्या पहिल्याच दिवशी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती; पण आता नव्या सरकारने आरे येथील कारशेडवरील स्थगिती उठवली आहे.
भारतातील डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन म्हणाले की, मला वाटते ही फार मोठी कल्पना आहे. भारताने या प्लास्टिकवर घातलेली बंदी ही पृथ्वीला मिळालेली मोठी देणगी आहे. भारत या दिशेने मोठे योगदान देत आहे; म्हणूनच मी भारताचे अभिनंदन करतो.
यातून मानवाची निसर्गाविषयी असलेली असंवेदनशीलताच दिसून येते. अशा मनोवृत्तीमुळेच निसर्गही त्याचे रौद्ररूप दाखवल्याखेरीज रहात नाही, हे लक्षात घ्या !
पर्यावरणमंत्र्यांनी यात लक्ष घालून होणारी वृक्षतोड थांबवावी, ही अपेक्षा !
यासमवेतच लक्षद्वीप, दक्षिण तमिळनाडूतील काही भाग आदी ठिकाणीही मौसमी पावसाला आरंभ झाला आहे. आंध्रप्रदेशातील रायलसीमा क्षेत्रात ३ जूनपर्यंत मान्सून पोचेल. गोवा राज्यात मान्सून पोचायला आणखी काही दिवसांची वाट पहावी लागेल, तर ३० मेपासून महाराष्ट्रात मान्सूनआधीचा पाऊस पडायला आरंभ झाला आहे.
चारधाम यात्रेच्या मार्गात सध्या सर्वत्र प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या यांसह कचर्याचे ढीग दिसत आहेत, जे पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक आहेत. यावर पर्यावरण तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.