‘माऊंट एव्हरेस्ट’वर सापडला तब्बल ३४ टन कचरा !

काठमांडू – जगातील सर्वांत उंच पर्वत असलेल्या ‘माऊंट एव्हरेस्ट’सह चार पर्वतांवर राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेच्या वेळी स्वच्छता करणार्‍या समुहाला तब्बल ३३.९ टन कचरा मिळाला. ५ एप्रिल ते ५ जून या दोन मासांच्या कालावधीत नेपाळी सैन्याच्या नेतृत्वात ‘सफा अभियान २०२२’ राबवण्यात आले. या अंतर्गत माऊंट एव्हरेस्ट, ल्होत्से, कांगचेनजंगा आणि मनास्लू येथून ३३ सहस्र ८७७ किलो कचरा गोळा केला.

या मोहिमेमध्ये सैन्याचे ३० सैनिक, ४८ शेर्पा आणि ४ डॉक्टर यांचाही सहभाग होता. नेपाळचे सैन्यमुख प्रभु राम शर्मा म्हणाले की, पर्यावरणाची सातत्याने हानी होत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा मोहिमांची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका 

यातून मानवाची निसर्गाविषयी असलेली असंवेदनशीलताच दिसून येते. अशा मनोवृत्तीमुळेच निसर्गही त्याचे रौद्ररूप दाखवल्याखेरीज रहात नाही, हे लक्षात घ्या !