विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – दक्षिण पश्चिम मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली आहे. प्रतिवर्षी १ जूनला येणारा मौसमी पाऊस यंदा केरळमध्ये मे मासातच पोचल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
(सौजन्य :LatestLY)
यासमवेतच लक्षद्वीप, दक्षिण तमिळनाडूतील काही भाग आदी ठिकाणीही मौसमी पावसाला आरंभ झाला आहे. आंध्रप्रदेशातील रायलसीमा क्षेत्रात ३ जूनपर्यंत मान्सून पोचेल. गोवा राज्यात मान्सून पोचायला आणखी काही दिवसांची वाट पहावी लागेल, तर ३० मेपासून महाराष्ट्रात मान्सूनआधीचा पाऊस पडायला आरंभ झाला आहे, अशी माहितीही हवामान खात्याने दिली.